Salgaon Murder: घरगुती वादातून मुलाने जन्मदात्या आईची चाकूने वार करून हत्या केली. Jalna Crime प्रकरणातील या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या जन्मदात्या आईचा पोटच्या मुलाने छातीत चाकू खुपसून निर्घृण खून केल्याची थरारक घटना परतूर तालुक्यातील सालगाव येथे घडली आहे. विशेष म्हणजे, आपल्या १६ वर्षीय मुलीने चिथावणी दिल्यानंतर आरोपी अंशीराम ठोके याने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलिसांनी बाप-लेकीवर कारवाई केली आहे.
नेमकी घटना काय? (Jalna Crime Salgaon Murder)
मिळालेल्या माहितीनुसार, सालगाव येथील मुंजा तुळजीराम ठोके यांचा मुलगा अंशीराम हा स्वतंत्र राहतो. २५ एप्रिल रोजी सायंकाळी अंशीराम आणि त्याची पत्नी कविता यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू होते. आरडाओरडा ऐकून अंशीरामची आई वसंताबाई मुंजा ठोके (वय ५५) या मध्यस्थी करण्यासाठी धावून गेल्या.
भांडण सोडवत असतानाच, अंशीरामची १६ वर्षीय मुलगी रागात वडिलांना म्हणाली, “या म्हातारीचा आपल्याला नेहमीचाच त्रास आहे, आज यांचा विषयच संपवून टाका.” नातीच्या या चिथावणीखोर शब्दांमुळे अंशीरामने रागाच्या भरात धारदार चाकूने आई वसंताबाईंच्या डाव्या छातीवर जोरदार वार केला.
रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू
Salgaon Murder हा वार इतका भीषण होता की, वसंताबाई रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. हल्ल्यानंतर आरोपी बाप-लेक घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत वसंताबाई यांना तातडीने सेलू येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
आरोपींना बेड्या
Partur Crime Salgaon Murder या प्रकरणी मुंजा ठोके यांच्या तक्रारीवरून परतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलगा अंशीराम ठोके याला अटक केली आहे. त्याला सुरुवातीला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर, अल्पवयीन नातीला बालसुधारगृहात धाडण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पल्लेवाड करत आहेत.
FAQs: जालना आईची हत्या प्रकरण (Jalna Crime Salgaon Murder) प्रश्नोत्तरे
१. नातीच्या चिथावणीवरून मुलानेच संपवला आईचा खेळ ही घटना जालन्यात कोठे घडली?
उत्तर: नातीच्या चिथावणीवरून मुलानेच संपवला आईचा खेळ ही घटना घटना परतूर तालुक्यातील सालगाव येथे घडली आहे.
२. मुलाने आईची हत्या का केली?
उत्तर: प्राथमिक तपासानुसार, घरगुती वादातून आणि रागाच्या भरात मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले.
३. हत्येसाठी कोणत्या शस्त्राचा वापर करण्यात आला?
उत्तर: आरोपी मुलाने घरातील धारदार चाकूचा वापर करून आईवर वार केले.
४. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे का?
उत्तर: हो, परतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलगा अंशीराम ठोके याला अटक केली आहे.
५. या घटनेचे इतर काही कारण असू शकते का?
उत्तर: पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत असून, मुलाची मानसिक स्थिती आणि व्यसनाधीनता या कोनातूनही चौकशी सुरू आहे.











