Jalna Crime News: सून झाली काळ! जेवणावरून सासऱ्याला काठीने अमानुष मारहाण; हृदयद्रावक घटना

jalna crime news Salgaon Murder Jalna News Partur Crime

Jalna Crime News: कौटुंबिक वादातून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एका सुनेने आपल्या वृद्ध सासऱ्याला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

नेमकी घटना काय?

ही घटना घनसावंगी तालुक्यातील माहेर जवळा येथे घडली आहे. कुंडलिक गव्हाणे (५५) असे मारहाण झालेल्या वृद्ध सासऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कुंडलिक गव्हाणे यांना भूक लागली होती. त्यांनी आपल्या सुनेला जेवणाबद्दल विचारले असता, त्यांच्यात किरकोळ बाचाबाची सुरू झाली. मात्र, हा वाद इतक्या थराला गेला की सुनेने संतापाच्या भरात काठीने सासऱ्यावर हल्ला केला.

काठीने केला अमानुष हल्ला

सुनेने हातातील काठीने सासऱ्याच्या डोक्यावर, कानावर आणि हातांवर सपासप वार केले. या मारहाणीत ५५ वर्षीय कुंडलिक गव्हाणे गंभीर जखमी झाले आहेत. घरासारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारे वृद्ध माणसावर हल्ला झाल्याने समाजाच्या नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर पीडित सासरे कुंडलिक गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर अशा प्रकारे मारहाणीत झाल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नेमक्या कोणत्या कारणामुळे ही परिस्थिती ओढावली, याचा शोध घेत आहेत.

Jalna Crime News धक्कादायक: लग्नाच्या आमिषाने अत्याचार; 4 महिन्यांची गर्भवती, आरोपीचा ‘वय लपवण्याचा’ डाव फोडला!

Ambad Ganja Case: पोलिसांनी 2.40 लाखांचा गांजा जप्त; 4 आरोपी ताब्यात

जालन्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना : Jalna Crime News

गेल्या काही दिवसांत जालन्यातून कौटुंबिक वादातून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियदर्शनी सोसायटीमध्ये सुनेने सासूची हत्या करून मृतदेह गोणीत भरून ठेवल्याची घटना ताजी असतानाच आता सासऱ्याला झालेल्या मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे.

कौटुंबिक नात्यांमध्ये वाढता संवाद अभाव आणि टोकाचा राग अशा हिंसक घटनांना कारणीभूत ठरत आहे. समाजात वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अशाच ताज्या घडामोडी Jalna News ला फॉलो करा.

View Comments (1) View Comments (1)

Comments are closed.