Crime

Ambad Ganja Case: पोलिसांनी 2.40 लाखांचा गांजा जप्त; 4 आरोपी ताब्यात

HIGHLIGHTS
  1. Quick summary of the latest Crime update.
  2. अंबड: घनसावंगीकडून अंबड शहराकडे होणारी गांजाची अवैध तस्करी रोखण्यात अंबड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश...
  3. Local impact and reader takeaways are grouped for fast scanning.
  4. Follow Jalna News for verified updates as this story develops.

अंबड: घनसावंगीकडून अंबड शहराकडे होणारी गांजाची अवैध तस्करी रोखण्यात अंबड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. घनसावंगी फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी ६ किलो गांजासह दोन दुचाकी असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Ambad Ganja Seized) केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय? (Ambad Ganja Seized)

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, घनसावंगीकडून काही तरुण दुचाकीवरून मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा अवैधरीत्या अंबड शहरात आणणार होते. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेने अंबड पोलिसांच्या मदतीने घनसावंगी फाटा परिसरात रविवारी सापळा रचला. संशयित दुचाकींची झडती घेतली असता पोलिसांना त्यात ६ किलो गांजा सापडला (Ambad Ganja Seized).

अटकेतील आरोपींची नावे:

पोलिसांनी या प्रकरणी खालील संशयितांना ताब्यात घेतले आहे:
१. सुरज गोविंद काळबंडे (रा. मच्छिंद्रनाथ चिंचोली, ता. घनसावंगी)
२. सचिन किसन नन्नवरे (रा. छत्रपती शिवाजीनगर, घनसावंगी)
३. संतोष सुंदर मुंढे (रा. माव पाटोदा, ता. परतूर)
४. महेश देवराव चव्हाण (रा. छत्रपती शिवाजीनगर, घनसावंगी)

जप्त मुद्देमाल:

  • गांजा: ६ किलो (किंमत १ लाख २० हजार रुपये)
  • वाहने: दोन दुचाकी (किंमत १ लाख २० हजार रुपये)
  • एकूण किंमत: २ लाख ४० हजार रुपये

कारवाई पथक:

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सी.व्ही. ठुबे यांच्यासह अंमलदार यशवंत मुंढे, संजय क्षीरसागर, अरुण मुंढे, तुकाराम मदन, अशोक मस्के, धनाजी गवळे, दीपक सोनवणे, विनोद भानुसे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सहभाग होता.

सर्व आरोपींविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गांजा कोठून आणला होता याचा तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा : Gold Jewelry Theft: सावधान! जालन्यात ‘तोतया’ पोलिसाचा थरार; ७ लाखांचे दागिने घेऊन भामटा पसार

आणखी वाचा : सिलिंडर चोरांचा धुमाकूळ! जालन्यात ११० सिलिंडरची धाडसी चोरी; पोलीसही चक्रावले! Gas Agency godown Robbery

Share this articleFacebookWhatsAppXTelegram
Jalna News Desk

Jalna News Desk

The Jalna News desk covers verified local updates, civic developments, public interest stories, and district-wide news for readers in Jalna and Marathwada.

Read More

Scroll to Top