Gold Jewelry Theft Jalna: तोतया पोलिसाचा धक्का! 7 लाखांचे दागिने लंपास

Elderly Woman Scammed Gold Jewelry Theft jalna news
Elderly Woman Scammed Gold Jewelry Theft jalna news

जालना/भोकरदन: जालन्यातील भोकरदन तालुक्यात ‘तोतया’ पोलिसाने एका वृद्ध दाम्पत्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “पुढे खून झाला आहे, दागिने काढून ठेवा,” अशी भीती घालून या भामट्याने ५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास (Gold Jewelry Theft) केले. ही घटना गुरुवारी सकाळी सिपोरा बाजार ते बोरगाव जहांगीर रस्त्यावर घडली.

नेमकी घटना काय? Elderly Woman Scammed Gold Jewelry Theft
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुबाई साहेबराव काळे आणि त्यांचे पती साहेबराव काळे हे आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी बोरगाव जहांगीर येथे जात होते. सिपोरा बाजार बसस्थानकावर उतरून पायी जात असताना, एका दुचाकीस्वाराने त्यांना अडवले. त्याने स्वतःला पोलीस कर्मचारी (Fake Police Scam) असल्याचे सांगितले. “काही दिवसांपूर्वी याच परिसरात सोन्याच्या दागिन्यांसाठी एका महिलेचा खून झाला आहे, तुम्ही दागिने घालून फिरणे सुरक्षित नाही,” असा बनाव त्याने रचला.

भामट्याने या वृद्ध दाम्पत्याला बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन, अंगठी आणि गळ्यातील पोत असे सुमारे ४ तोळे ५ ग्रॅम (जवळपास ५ तोळे) दागिने काढून घेण्यास भाग पाडले. दागिने हातात येताच तो दुचाकीवरून पसार झाला. या दागिन्यांची आजच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे ७ लाख रुपये आहे.

पोलिसात गुन्हा दाखल:
या घटनेनंतर काळे दाम्पत्याने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटा लांब निघून गेला होता. इंदुबाई काळे यांनी याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नेटके यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Comments (1) View Comments (1)

Comments are closed.