---Advertisement---

Jalna Rain Today: अवकाळी पावसाचा कहर! वीज कोसळून 2 तरुणांचा जागीच मृत्यू

Jalna Rain Lightning Strike Ambad Jalna Rain- अवकाळी पावसाचं रौद्र रूप; अंगावर वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू
JALNA NEWS TODAY LOCAL INSIGHTS
April 8, 2026 5:07 PM

Follow Us -

google-news
---Advertisement---
Jalna News WhatsApp Channel Follow

Jalna Rain Today: राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, जालना जिल्ह्यात सोमवारी (३० मार्च) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने मोठी हानी केली आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा येथे वीज कोसळून दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय? Jalna Rain Today

हवामान विभागाने पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जालन्यात अचानक वातावरणात (Jalna Rain Today) बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. महाकाळा गावात पाऊस सुरू असताना विजांचा कडकडाट झाला आणि थेट झाडावर वीज कोसळली. दुर्दैवाने या झाडाचा आधार घेतलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

जनजीवन विस्कळीत आणि पिकांचे नुकसान
या अवकाळी पावसामुळे (Jalna Rain Today) जालन्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात असूनही अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

JALNA NEWS TODAY LOCAL INSIGHTS

Jalna News Team

Jalna News Team provides accurate and timely latest Jalna News Today updates live Marathi News on Government updates, Education & Career, Crime, Finance, Agriculture, Business across Maharashtra. Our mission is to deliver reliable, easy-to-understand information that keeps readers informed and empowered.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now