जालना: जालना शहरात अवैध शस्त्रास्त्रांविरुद्ध Jalna Police यांनी मोठी मोहीम उघडली आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महावीर चौक भागातील एका प्रसिद्ध कापड दुकानातून पोलिसांनी चक्क २१ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २१ धारदार तलवारी जप्त केल्या असून, होळी आणि धुळवडीचा सण तोंडावर असताना झालेल्या या कारवाईमुळे शहरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘जय मातादी मेन्स वेअर’ या दुकानात बेकायदेशीररीत्या शस्त्रे लपवून ठेवल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन सानप यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसह गुरुवारी रात्री उशिरा दुकानावर छापा टाकला.
झाडाझडतीत धक्कादायक वास्तव समोर:
पोलिसांनी जेव्हा दुकानाच्या तिसऱ्या मजल्याची तपासणी केली, तेव्हा त्यांना तेथे लपवून ठेवलेल्या २१ स्टीलच्या तलवारी आढळून आल्या. या तलवारींची किंमत सुमारे २६,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या शस्त्रांबाबत कोणताही परवाना किंवा वैध कागदपत्रे सादर न करू शकल्याने पोलिसांनी दुकान मालक
मनीष दिलीपकुमार निहलानी (वय ४३, रा. अजिंठा नगर) याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.
Jalna Police पुढील तपास:
एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी शहरात कशासाठी आणल्या होत्या? याचा पुरवठा कोठून झाला? आणि यामागे काही मोठा कट आहे का? याचा सज्जड तपास Jalna Police करत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.










