Jalna Diesel Shortage: 1000 लिटर डिझेलसाठी पंपचालकावर हल्ला; धक्कादायक घटना

सध्या संपूर्ण राज्यात डिझेलची अभूतपूर्व टंचाई (Diesel Shortage in Maharashtra) जाणवत असतानाच, जालना जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Jalna News Desk
8 Apr 2026, 5:08 PM IST रोजी अपडेट
1 मिनिट वाचन 1

Jalna Diesel Shortage: राज्यासह जालना जिल्ह्यात सध्या डिझेलची अभूतपूर्व टंचाई (Jalna Diesel Shortage) जाणवत आहे. मात्र, याच टंचाईतून आता वादाचे आणि हाणामारीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. जास्तीचे डिझेल देण्यास नकार दिल्याने जालना तालुक्यातील वानडगाव येथील एका पेट्रोल पंप चालकाला दोन व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, वानडगाव येथील पेट्रोल पंप चालक राहुल उगले हे काल रात्री साडेनऊच्या सुमारास पंपावर असताना दोन व्यक्ती तिथे आले. त्यांनी थेट १ हजार लिटर डिझेलची मागणी केली. सध्या इंधनाचा तुटवडा (Jalna Diesel Shortage) असल्याने आणि प्रशासनाचे नियम असल्याने राहुल उगले यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल देण्यास नम्रपणे नकार दिला.

Jalna Diesel Shortage वादाचे रुपांतर हाणामारीत

डिझेल मिळत नसल्याचे पाहून त्या दोन व्यक्तींचा पारा चढला. त्यांच्यात आणि राहुल उगले यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या दोघांनी राहुल उगले यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे वानडगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

इंधन संकट आणि कायदा-सुव्यवस्था

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक (Jalna Diesel Shortage) लागले आहेत. मर्यादेपेक्षा जास्त इंधन देण्यावरून वाहनधारक आणि पंप चालक यांच्यात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वानडगावमधील या घटनेने आता इंधन भरताना सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

जालना पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, राहुल उगले यांनी याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वाद पाहा CCTV मधे कैद

Tags:
शेअर करा: WhatsApp

या बातमीबद्दल तुम्हाला कसे वाटते?

Jalna News Desk

Jalna News Desk

लेखक

As a digital journalist at JalnaNews.com, Sandeep Patekar specializes in real-time updates, regional politics, and breaking crime reports. They thrive on the front lines of local events to keep Jalna informed as the news happens.

419 लेख पहा