TravelAll Stories

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे टोल माफी! 26 मार्चपर्यंत मोफत प्रवास – ‘ही’ अट लक्षात ठेवा Toll Waiver

Toll Waiver On Mumbai-Pune Expressway: मुंबई वाटसरूंसाठी साठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Advertisement

Toll Waiver on Mumbai-Pune Expressway: मुंबई वाटसरूंसाठी साठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोणावळा येथील कार्ला गडावर भरणाऱ्या आई एकवीरा देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त (Ekvira Devi Yatra) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवसांची टोल माफी (Toll Waiver) जाहीर करण्यात आली आहे. ही सवलत मंगळवार (२४ मार्च) पासून सुरू झाली असून, ती २६ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

कुणाला मिळणार लाभ?
प्रामुख्याने आगरी-कोली बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक या Mumbai-Pune Expressway महामार्गावरून प्रवास करतात. या भाविकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) ठराविक कालावधीसाठी ही टोल माफी (Toll Waiver) मंजूर केली आहे.

टोल माफीसाठी ‘ही’ अट महत्त्वाची (Toll Waiver)

मात्र, ही टोल माफी (Toll Waiver) सर्वच प्रवाशांसाठी नसून केवळ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी भाविकांकडे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या कार्यालयाचे संमती पत्र (Consent Letter) असणे अनिवार्य आहे. टोल नाक्यावर हे पत्र दाखवल्यानंतरच वाहनांना विनाशुल्क सोडले जात आहे.

प्रशासनाचे आवाहन
यात्रेच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता मावळ प्रशासन आणि ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. भाविकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि वेगमर्यादेचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून त्यांची वाहतूक Mumbai-Pune Expressway कडे वळवण्यात आली आहे.

Advertisement

Jalna News Desk

419 Stories

As a digital journalist at JalnaNews.com, Sandeep Patekar specializes in real-time updates, regional politics, and breaking crime reports. They thrive on the front lines of local events to keep Jalna informed as the news happens.

Scroll to Top