Ladki bahin yojana 3rd installment: लाडकी बहीण चा तिसरा हप्ता मिळाला, लाडक्या बहिणींचे चेहरे खुलले!

Ladki bahin yojana 3rd installment: ‘लाडकी बहीण’चा तिसरा हप्ता मिळाला बँकेच्या खात्यात पुन्हा १५०० रुपये जमा झाले; लाडक्या बहिणींचे चेहरे खुलले!

जिल्ह्यात ‘नारीशक्ती ॲप’द्वारे २ लाखांपेक्षा अधिक महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरिता अर्ज केले आहेत. त्यापैकी अनेकींच्या मोबाईलवर १४ व १५ ऑगस्ट रोजी बँक खात्यात ३ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचे संदेश धडकले.

तसेच २७ सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे १५०० रुपये देखील जमा झाल्याचे संदेश अनेक महिलांना प्राप्त झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

Ladki bahin yojana 3rd installment

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जुलै महिन्याअखेर १ लाख ८८ हजार ४२१ महिलांनी अर्ज केला होता. त्यापैकी पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात शासनाने ठरल्यानुसार रक्षाबंधन सणापूर्वीच, १४ व १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ३ हजार रुपयांची रक्कम जमा केली.

तेव्हापासून तिसऱ्या हप्त्याचे १५०० मिळणार की ३०००? पुन्हा रक्कम जमा होईल की नाही? असे अनेक प्रश्न महिलांमधून उपस्थित केले जावू लागले.

अशात २७ सप्टेंबर रोजी अनेक पात्र लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर त्यांच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपयांची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आल्याचे संदेश धडकले. Ladki bahin yojana 3rd installment ची ही वार्ता महिलांसाठी अत्यंत आनंददायी ठरली.

ऑगस्ट महिन्यात १.१७ लाख महिलांची भर

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३९६ महिलांनी लाभ मिळण्याकरिता अर्ज केले. त्यातील १ लाख १० हजार ५१८ अर्जांची छानणी झाली.

मंजूर झालेले १ लाख ५ हजार ८४ अर्ज शासनस्तरावर पाठविण्यात आले होते, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी दिली.

आधार लिंक नसलेल्या खात्यांत जमा झाले नाही पैसे

यापूर्वी १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत शासनस्तरावरुन लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. तसेच तिसऱ्या हप्त्याचे १५०० रुपये देखील २७ सप्टेंबरला जमा झाले आहेत.

मात्र, बँकेच्या खात्याशी आधार क्रमांक लिंक नसलेल्या महिलांना रक्कम प्राप्त झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा