Jalna NewsAll Stories

मोठी बातमी! Jalna Petrol Rationing लागू; दुचाकीला 200₹, कारला मर्यादा

जालन्यात पेट्रोलचं रेशनिंग! Jalna Petrol Pump वर 'No Stock' चे बोर्ड; आता दुचाकीला २०० तर कारला मिळणार फक्त 'इतकंच' पेट्रोल!

Advertisement

Jalna Petrol Pump: जालना जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती उद्भवू नये आणि उपलब्ध इंधनाचा पुरवठा सर्वांना समान व्हावा, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णघेतला आहे. आता Jalna Petrol Pump वर इंधन भरण्यासाठी नवीन पेट्रोल मर्यादा (Petrol Limit) लागू करण्यात आली आहे.

नव्या नियमावलीनुसार इंधन मर्यादा:Jalna Petrol Pump

प्रशासनाचा ‘हा’ आहे नवीन नियम: जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल पंपांना खालीलप्रमाणे इंधन विक्रीचे आदेश देण्यात आले आहेत:

  • दुचाकी वाहने (Two-wheelers): जास्तीत जास्त २०० रुपये.
  • चारचाकी वाहने (Four-wheelers): जास्तीत जास्त २,००० रुपये.

गर्दीचे कारण काय?
इस्रायल-इराण युद्धामुळे (Iran-Israel War) इंधन साठा संपणार असल्याच्या चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी एकाच वेळी पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर धाव घेतली. प्रत्यक्षात, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे

अफवेचा मोठा फटका
गेल्या दोन दिवसांपासून इस्त्राईल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन संपणार असल्याची अफवा पसरली होती. यामुळे जालन्यातील अनेक Jalna Petrol Pump वर नागरिकांनी रांगा लावल्या. काही पंपांवर तर ‘नो स्टॉक’ (No Stock) चे फलकही पाहायला मिळत आहेत. 

प्रशासनाचे स्पष्टीकरण

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. केवळ पॅनिक्स बायिंग (Panic Buying) टाळण्यासाठी आणि रांगा कमी करण्यासाठी ही तात्पुरती मर्यादा घालण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि साठेबाजी करू नये पोलिसांनाही गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

Jalna News Desk

419 Stories

As a digital journalist at JalnaNews.com, Sandeep Patekar specializes in real-time updates, regional politics, and breaking crime reports. They thrive on the front lines of local events to keep Jalna informed as the news happens.

Scroll to Top