Jalna News Today: विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जात वैधता प्रमाणपत्र

Jalna News Today: इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमातंर्गत संबंधित महाविद्यालयातच जात वैधता प्रमाणपत्र (Caste validity certificates) मिळणार आहे.

जिल्ह्यातील काही महाविद्यालयांमध्ये जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्याचठिकाणी संबंधित विद्यार्थ्याचा अर्ज स्वीकारून जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste validity certificates) समितीकडून देण्यात आली.

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहीम

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागा मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बाटी), पुणे यांच्या निर्देशानुसार दि.१ जानेवारी २०२५ पासून पुढे १०० दिवस या कालावधीत १०० दिवस उद्दिष्टपूर्ती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यातील इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग एसईबीसी (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्या वतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थी वेळेत. त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे (Caste validity certificates) प्रस्ताव समितीकडे दाखल करीत. नाहीत, पर्यायाने अशा विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही.

ही अडचण विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२४-२५, तसेच २०२५-२६ मध्ये इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग, सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग, एसईबीसी (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे.

ऑनलाइन करा अर्ज : Jalna News Today

  • संबंधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन करावेत.
  • या अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात दाखल करावी व संबंधित महाविद्यालयांनी असे अर्ज या कालावधीत फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावेत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Jalna News Today)

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा