जालना/मंठा:जिंतूर-जालना महामार्गावर गणेशपुरी (Ganeshpuri Phata Accident) फाट्याजवळ रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. स्विफ्ट डिझायर कार आणि मिनीबस यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Car Minibus Collision Jalna Jintur Ganeshpuri Phata Accident
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील रहिवासी असलेले सय्यद आबेदअली सय्यद मेहबूबअली (वय ४५) आणि त्यांचे कुटुंबीय ईदच्या निमित्ताने मंठ्याला आपल्या बहिणीच्या घरी जात होते. त्यांची कार (क्रमांक MH 12 GF 6259) गणेशपुरी फाट्यावरील (Ganeshpuri Phata Accident) एका वळणावर आली असता, समोरून येणाऱ्या १७ सीटर मिनीबसशी तिची जोरदार धडक झाली. (Car Minibus Collision Jalna) ही मिनीबस छत्रपती संभाजीनगरहून जिंतूर तालुक्यातील बोरी येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होती.
अपघाताची भीषणता: Car Minibus Collision Jalna
धडक इतकी जोरात होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. मिनीबस मधील प्रवाशांसह एकूण ८ जण या अपघातात जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना व छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आले आहे.
धोकादायक वळण ठरतेय ‘डेथ ट्रॅप’:
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, ते गणेशपुरी फाट्यावरील वळण अत्यंत धोकादायक मानले जाते. विशेष म्हणजे, याच ठिकाणी काही आठवड्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात एका वरिष्ठ पत्रकाराचा आणि एका सरकारी अधिकाऱ्याचा अशाच प्रकारे अपघाती मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, (Ganeshpuri Phata Accident) या ठिकाणी गतिरोधक किंवा कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
मंठा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.










