जालना: गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर, आज जालना जिल्ह्याला निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला. जालना शहरासह मंठा, तळणी आणि रांजणी परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने हजेरी लावली. या निसर्गाच्या लहरीपणामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे प्रचंड शेती नुकसान (Crop Damage) झाले असून बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.
जालना अवकाळी पाऊस (Jalna Unseasonal Rain)
पिकांची दाणादाण
जालना जिल्ह्यात (Jalna News Today) सध्या रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, आज झालेल्या वादळी पावसामुळे आणि मोठ्या आकाराच्या गारांमुळे शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत. प्रामुख्याने मका आणि हरभरा या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारपीट (Hailstorm in Jalna) गारांच्या माऱ्यामुळे मक्याची कणसे गळून पडली आहेत, तर हरभऱ्याच्या घांट्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
मंठा आणि रांजणी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल काढून खळ्यावर ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे हा माल भिजला असून तो आता खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. “वर्षभर काबाडकष्ट करून पीक हाती येण्याची वेळ आली असताना निसर्गाने घात केला,” अशी भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तात्काळ पंचनाम्यांची मागणी
जालना अवकाळी पाऊस (Jalna Unseasonal Rain) या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे स्वरूप पाहता, कृषी विभागाने आणि महसूल प्रशासनाने तातडीने शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, तरच त्यांना या संकटातून सावरणे शक्य होईल, असे स्थानिक लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे.
हवामान खात्याचा इशारा
येत्या २४ ते ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपला काढलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.










