Home Loan Will Be Cheaper: गृहकर्ज स्वस्त होणार; रिझर्व्ह बँकेकडून ‘इतके’ टक्के दरकपात

Home loan will be cheaper: रिझर्व्ह बँकेकडून 2025 च्या पहिल्या सहामाहीत रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची कपात केली जाणे शक्य आहे, असा कयास जेफरीज या जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्थेने शुक्रवारी व्यक्त केला.

बँकिंग व्यवस्थेतील आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेतील निधीची तरलता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले. त्यामुळे येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 50 आधार बिंदूंची कपात केली जाण्याची शक्यता आहे.

गृहकर्ज स्वस्त होणार: Home Loan Will Be Cheaper

संभाव्य रेपोदर कपातीमुळे, (Home loan will be cheaper) नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्यासह गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. मात्र या बदलामुळे बँकांच्या निव्वळ व्याजापोटी उत्पन्नावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे.

बँकांचे उत्पन्न 3.8 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे, ज्याचा जाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अधिक होण्याची शक्यता जेफरीजच्या अहवालाने व्यक्त केली आहे

उच्च व्याजदराच्या बाबतीत या वर्षापासून दिलासा मिळू शकतो. देशातील आणि जगातील बँकिंग तज्ञ आणि वित्तीय संस्थांच्या अंदाजानुसार, भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 6% च्या खाली येऊ शकतो.

दुसरीकडे, आर्थिक विकास दर मंदावण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकने रेपो रेट मध्ये (Home loan will be cheaper) कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्ज स्वस्त मिळू लागेल आहे.

रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात पतधोरणात वाढ केलेली नाही. पण रेपो दर अजूनही 6.50% वर आहे, जो सात वर्षातील सर्वोच्च पातळी आहे. SBI समुहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष म्हणाले, “RBI च्या ताज्या निर्णयापूर्वी उच्च व्याजदर दीर्घकाळ टिकतील अशी भीती होती.

मात्र, आता मागील काही महिन्यांपासून व्याजदर (Home loan will be cheaper) कमी होण्यास सुरुवात होत आहे आणि कपातीची प्रक्रिया ही अजून दीर्घकाळ सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऑक्टोबर नंतर दर 0.75% ने कमी केला जाऊ शकतो 2023-24 आर्थिक वर्षात 6.5% आर्थिक विकास दराचा अंदाज बरोबर आहे याची खात्री करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑक्टोबर 2023 नंतर रेपो दरात 0.75% कपात करू शकते. -नोमुरा, एक जपानी आर्थिक फर्म

2024 च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत रेपो दरात 0.25-0.25% कपात केली जाऊ शकते. RBI च्या लक्ष्याची वरची मर्यादा किरकोळ महागाई दर 6% च्या खाली राहील. -गोल्डमन सॅक्स, एक अमेरिकन गुंतवणूक बँकिंग फर्म

भारतातील महागाई अपेक्षेपेक्षा जास्त असल्यास, धोरणात्मक दर देखील वाढवले ​​जाऊ शकतात. परंतु आर्थिक वाढ मंदावल्यास, दरांमध्ये तीव्र कपात (Home loan will be cheaper) हा एक पर्याय असू शकतो. -सिटी, अमेरिकन बँकिंग फर्म

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा