मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे.
सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या वर प्रतिक्रिया देताना बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.