jalna news GSDA

कर्तव्यापलीकडची सामाजिक बांधिलकी; आंबेवाडीत GSDA कर्मचाऱ्यांचे श्रमदान

जालना : जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (GSDA) जालना कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मौजे आंबेवाडी (ता. जालना) येथे सामूहिक श्रमदानातून विविध पर्यावरणपूरक कामे केली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे येथील आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

jalna news

श्रमदानातून जलसंधारण, वन्यजीव संरक्षण आणि भूजल पुनर्भरणाचा त्रिवेणी संगम!
आंबेवाडी येथे GSDA अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम; वनराई बंधाऱ्याची उभारणी, पाणवठ्याची स्वच्छता व रिचार्ज शाफ्टची दुरुस्ती

कार्यालयीन कामकाजासोबतच सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकी जपत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानातून जलसंवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमांतर्गत खालील महत्त्वाची कामे पार पडली:

  • वनराई बंधाऱ्याची उभारणी : आंबेवाडी येथील नाल्यावर स्थानिक साधनसामग्री व सामूहिक श्रमातून वनराई बंधारा उभारण्यात आला. यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून स्थानिक स्तरावर जलसंचय होण्यास आणि परिसरातील भूजल पुनर्भरणास मोठी चालना मिळणार आहे.
  • वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्याची स्वच्छता : जंगल परिसरातील हरीण व इतर वन्यप्राण्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नैसर्गिक पाणवठ्यातील गाळ, कचरा व अडथळे दूर करण्यात आले. यामुळे स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणालाही हातभार लागला आहे.
  • रिचार्ज शाफ्टची दुरुस्ती : पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी नाल्यातील रिचार्ज शाफ्टची नियमित देखभाल महत्त्वाची असते. श्रमदानातून या शाफ्टची दुरुस्ती करून अस्तित्वातील जलसंधारण संरचनांची कार्यक्षमता टिकविण्यात आली.
jalna news

यांचा होता सहभाग :
या उपक्रमात वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कैलास आहेर, सहायक भूवैज्ञानिक सी. एच. गिरिधर, डॉ. कृष्णा देशपांडे, वैज्ञानिक संदीप सिरसाट, मोहसीन शेख, अभियंता घोगरे, ॲड. अजहर, कोंडेस्वर खरात, दौलत ढवळे, गणेश शेळके, दत्ता जाधव आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विशेष परिश्रम घेतले.

केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता शासकीय यंत्रणेने प्रत्यक्ष श्रमदानातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि वन्यजीव संरक्षणाचा हा उपक्रम राबवल्याने सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.

Newsletter Updates

Enter your email address below and subscribe to our newsletter