Wrong upi transaction: चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास टेन्शन घेऊ नका ‘या’ नंबरवर तक्रार दाखल करा! झटक्यात येतील पैसे

Wrong upi transaction: इंटरनेटचा वापर वाढल्याने आजकाल बँकिंग क्षेत्रातील कामे ऑनलाईन पद्धतीने केले जातात. मात्र ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना नकळत आपल्याकडून बँक खाते क्रमांक चुकीचा टाईप होतो आणि पैसे चुकीच्या खात्यावर जातात.

परंतु जर अशी परिस्थिती उद्भवली तर आपण काय करावं? मला ते पैसे परत कसे मिळतील?

मात्र असच काही तुमच्याकडून झालं तर घाबरू नका. पुढील 48 तासांच्या आत पैसे परत मिळवता येऊ शकतात.

हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.

Wrong upi transaction

जर तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर लगेच तुमच्या बँकेला कळवा. कस्टमर केअरला कॉल करा आणि त्यांना संपूर्ण गोष्ट सांगा.

जर बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती विचारली, तर त्यात या चुकीने झालेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्या. ट्रान्झॅक्शनची तारीख आणि वेळ, तुमचा खाते क्रमांक आणि ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले ते नमूद केल्याचे सुनिश्चित करा.

अशावेळी तुम्हाला पेमेंट प्लॅटफॉर्मच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा लागेल. जिथे तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. यानंतर तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवावी लागेल.

मग शक्य तितक्या लवकर तुम्हाला तुमच्या बँकेतही चुकीच्या (Wrong upi transaction) पेमेंटची तक्रार दाखल करावी लागेल.

NPCI UPI Complaint Number

यूपीआय आणि नेट बँकिंगमधून चुकीच्या अकाऊंट नंबरवर पेमेंट केल्यास (NPCI UPI Complaint Number) 18001201740 या नंबरवर तक्रार दाखल करा. यानंतर संबंधित बँकेत जाऊन फॉर्म भरून त्याची माहिती द्यावी. बँकेने मदत करण्यास नकार दिल्यास bankingombudsman.rbi.org.in या वेबसाईटवर तक्रार करावी.

मात्र रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार तक्रार केल्यास 48 तासांच्या आत पैसे परत करण्याची जबाबदारी बँकेची असते. त्यामुळे यूपीआय आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यानंतर फोनवर आलेला मेसेज डिलीट करू नका. या मेसेजमध्ये पीपीबीएल नंबर असतो जो तक्रारीच्या वेळी आवश्यक असतो.

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा