मतदान कार्ड वरील फोटो बदलायचा आहे? या स्टेप्स फॉलो करा. Voter ID Photo Update

Voter ID Photo Update
Voter ID Photo Update

Voter ID Photo Update: भारतवासीयांसाठी वोटर आयडी हे कागदपत्र खूप महत्त्वाचे आहे. वोटर आयडी असल्यास नागरीकांना मतदानाचा अधिकार असतो. मात्र वोटर आयडीवरील फोटो जुना झाला असल्यास तो बदलायचा (Voter ID Photo Update) असल्यास खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

या स्टेप्स फॉलो करा! : Voter ID Photo Update

▪️सर्वप्रथम तुम्हाला राज्य मतदार सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
▪️त्यानंतर वेबसाइट वर उपलब्ध असलेल्या मतदार यादीतील नोंदी सुधारणे हा पर्याय निवडा.
▪️त्यानंतर फॉर्म नंबर 8 हा पर्याय निवडा. यात तुम्हाला तुमचे राज्य, विधानसभा आणि तुम्ही ज्या मतदारसंघांमध्ये मोडत आहात त्या ठिकाणाचे नाव निवडण्यास सांगितले जाईल.
▪️पुढे तुम्ही फॉर्ममधील सर्व माहिती व्यवस्थित भरा. तुमचे नाव, प्रभाग क्रमांक, सिरियल नंबर आणि फोटो आयडी मतदार क्रमांक भरा.
▪️यानंतर फोटोग्राफ या उपलब्ध पर्यायावर क्लिक करा.
▪️यात तुम्हाला वयक्तीक तुमचे नाव, पत्ता, ओळखपत्र आणि मतदार क्रमांक भरण्यास सांगितले जाते.
▪️त्यानंतर तुमची आवश्यक असलेली वयक्तीक माहिती जसे की जन्मतारीख, लिंग, आई-वडील किंवा नवऱ्याचे नाव भरा. त्यानंतर तुमचा नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा.
▪️फोटो अपलोड झाल्यानंतर ईमेल आयडी, फोन नंबर आणि ठिकाणाचे नाव भरा. यानंतर हा अर्ज सबमिट करा.
▪️त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोन नंबर आणि ईमेल आयडीवर यासंबंधित मेसेज मिळेल.
▪️त्यानंतर पुढच्या महिन्याभरात तुम्हाला वोटर आयडी किंवा मतदार यादीत सुधारणा झाल्याचे दिसेल.

Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *