केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक दीर्घकालीन सुरक्षित बचत योजना आहे. ही योजना शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत सुरु करण्यात आली आहे. विशेषतः देशातील महिलांच्या महत्वपूर्ण गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे.
सुकन्या समृद्धी योजना खाते
सुकन्या समृद्धी या योजनेअंतर्गत तुम्ही 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता आणि प्रति वर्ष 250 ते 1.50 लाख रुपये गुंतवूण मोठा परतावा मिळवू शकता. मुलीच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत मुलचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकता.
तसेच मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी संपूर्ण रक्कम तुम्हाला काढता येते. सुकन्या समृद्धी योजना या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या टेंशनमुक्त मुक्त होऊ शकता. या योजनेअंतर्गत सरकार सध्या जमा केलेल्या रकमेवर 7.6 टक्के व्याजदराचा लाभ देत आहे.