Satbara Utara: 7/12 उताऱ्यात चूक आढळली? आता ऑनलाइन सुधारणा करण्याची संधी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मालमत्ता खरेदी करताना किंवा वारसाहक्काने मिळालेल्या जमिनीच्या व्यवहारात 7/12 उताऱ्याचा (Satbara Utara) विशेष महत्त्व असतो. हा उतारा म्हणजे जमिनीच्या मालकीचा, शेतीचा आणि कायदेशीर तपशील असलेला अधिकृत दस्तऐवज असतो. मात्र अनेक वेळा या कागदपत्रांमध्ये नावात, क्षेत्रफळात, पिकांच्या तपशीलात किंवा इतर माहितीमध्ये चुका आढळून येतात, ज्यामुळे पुढील व्यवहारात अडथळे येऊ शकतात.

आता अशा चुका सुधारण्यासाठी नागरिकांना थेट महाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://bhulekh.mahabhumi.gov.in/) जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. या प्रक्रियेमुळे कार्यालयीन धावपळीशिवाय घरबसल्या सुधारणा अर्ज करता येतो.

ऑनलाईन 7/12 उतारा (Satbara Utara) सुधारणा प्रक्रिया कशी करावी?

  1. महाभूमी पोर्टलला भेट द्या
    सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. “ई-हक्क प्रणाली” निवडा
    होमपेजच्या सर्वात खाली उजव्या बाजूला “ई-हक्क प्रणाली” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  3. लॉगिन किंवा नवीन खाते तयार करा
    पुढील पानावर “Proceed to Login” बटणावर क्लिक करा. तुमचं अकाउंट आधीपासून असेल, तर लॉगिन करा. नसल्यास, नवीन खाते तयार करा.
  4. “7/12 Mutation” पर्याय निवडा
    लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्डवर “7/12 Mutation” या पर्यायावर क्लिक करा.
  5. यूजर रोल निवडा
    एक पॉपअप मेसेज दिसेल, जिथे तुमचा युजर रोल – नागरिक, बँक, सोसायटी यापैकी योग्य पर्याय निवडावा लागेल. मग “Proceed” बटणावर क्लिक करा.
  6. जमिनीचा तपशील भरा
    तुमच्या जमिनीचा तपशील – म्हणजे गट नंबर, गाव, तालुका, जिल्हा – व्यवस्थित भरा.
  7. चूक काय आहे, ते नमूद करा
    7/12 उताऱ्यात नोंदवायची चूक कोणती आहे – उदाहरणार्थ, नावाची चूक, क्षेत्रफळात गडबड, पिकांची चुकीची माहिती – ती स्पष्टपणे लिहा.
  8. अर्ज सादर करा
    सर्व माहिती तपासून घेतल्यानंतर ऑनलाईन अर्ज सबमिट करा.

एक महत्त्वाची सूचना:

सुधारणा अर्जासोबत संबंधित पुरावे अपलोड करणे आवश्यक असू शकते, त्यामुळे कागदपत्रे तयार ठेवावीत.

या ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून आता नागरिकांना 7/12 उताऱ्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी तलाठी कार्यालयाचे वारंवार फेरे टाळता येतील, आणि प्रक्रिया पारदर्शक व सोपी होईल.

तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड योग्य ठेवण्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा