MSRTC Bus Tracking: राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून, प्रणालीची यशस्वी चाचणीही नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे.
व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम: MSRTC Bus Tracking System
एसटी’महामंडळातर्फे प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या धर्तीवर बसची माहिती सहज समजण्यासाठी समजण्यासाठी ऑनलाईन ‘व्हीटीएस’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. सद्यास्थितीला एसटी महामंडळातील १६ हजारांहून अधिक नव्या-जुन्या बसमध्ये ‘व्हीटीएस’ ही आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे.
व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम (MSRTC Bus Tracking) या यंत्रणेची विविध पातळ्यांवर चाचण्या करण्यात आल्या. यातून समोर आलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या असून, प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. अॅप विकसित करण्याचेही काम सुरू आहे.
आता आरक्षण केलेल्या किंवा अपेक्षित बसची माहिती कोठे आहे, किती अंतरावर आहे, बस बिघडली आहे किंवा नाही, किती विलंब होणार आहे, याची माहिती एका क्लिकवर समजणार आहे.
