Mazi ladki bahin yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही भन्नाट योजना राबवली आहे या योजनेला राज्यभरातून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्यापासून प्रति माह दीड हजार रुपये दिले जात आहेत.
अशातच राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत आणि सक्षमीकरणाच्या उद्देशाने पुरवणे अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana या योजनेच्या आत्तापर्यंतचे हप्ते देखील महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत, अशातच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता देखील 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांना मिळणार आहे.
Mazi Ladki Bahin Yojana next installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते (Mazi Ladki Bahin Yojana next installment) एकत्रितपणे महिलांना मिळणार आहेत कारण लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana next installment या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील सभेत बोलताना घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले आहेत मात्र आता सप्टेंबर महिन्याचे देखील दीड हजार रुपये मिळाले आहेत, मात्र आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे येत्या 10 ऑक्टोबरच्या आत दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.
त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर पर्यंत मिळणार आहेत.
याशिवाय महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या कल्याणासाठी सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे गैरवापर देखील मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana या योजनेच्या अंतर्गत चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या तब्बल 16 पुरुषांचे तसेच या गैर प्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात (फ्रीज करण्यात) आले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
यापुढेही महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी देखील नवी मुंबईतील महिलांच्या नावे सातारा येथील एका व्यक्तीने पत्नीचे फोटो वापरून 30 अर्ज केले होते तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं त्यामुळे आता यंत्रणा देखील अधिक कडक केली आहे यामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे.