मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळणार? Majhi ladki bahin yojana last date

Majhi ladki bahin yojana last date: राज्य सरकराने महिलांच्या हितासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. मात्र आता योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट्स आहे.

Majhi ladki bahin yojana last date extended

महाराष्ट्र सरकारनं पुरवणी अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पहिली अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती.

मात्र,त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Majhi ladki bahin yojana) लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली होती.

मात्र आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा महिलांना दिलासा देत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत तब्बल 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा