Jalna News: मत्स्यपालन सहकारी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबतचा तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी ३० लाख रुपयांची मागणी केल्यानंतर २५ लाख रुपयांवर तडजोड झाली. पहिला हप्ता म्हणून पाच लाख स्वीकारताना जालना जिल्हा येथील दुग्ध कार्यालयातील सहायक निबंधक (सहकारी संस्था) वर्ग-2 आणि सहकार अधिकारी (वर्ग-3) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.
ही कारवाई शुक्रवारी (3 जानेवारी) सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी रात्री तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalna News: जालना जिल्हा निबंधक लाच प्रकरण उघड
संजय अर्जुनराव आरख (वय ५४) आणि शेख रईस शेख जाफर (वय ४४) अशी लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. संजय आरख (रा. रंगनाथनगर, इंदेवाडी) हे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था – वर्ग – 2) आणि शेख रईस हे सहकारी अधिकारी (वर्ग-2, रा. छत्रपती संभाजीनगर) आहेत. याप्रकरणी पन्नास वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली.
तक्रारीनुसार वरील प्रकरणात लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून 27 डिसेंबर 2024 रोजी 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. 25 लाखांवर तडजोड झाली. पंचांसमोर या रकमेचा पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.
तक्रारदार यांची मंठा तालुक्यातील डहा येथील विशाल मच्छ व्यावसायिक सहकारी संस्था आहे. या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्याबाबत जालना जिल्हा येथील दुग्धव्यवसाय कार्यालयातील सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.
हा तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष लाच स्वीकारण्याचे मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी शंकर मुटेकर यांच्या पथकाने पंचासमक्ष लाचेची मागणी करताना दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
This article highlights a corruption case in Jalna’s Registrar Cooperative Department, where officials demanded a bribe of Rs 30 lakh. Stay tuned for more updates on Jalna news
