Jalna News Today Marathi: जालना येथे एका व्यापाऱ्याची १२ लाख ५० हजार रुपयांची बॅग लुटणाऱ्या चार दरोडेखोरांच्या टोळीचा वाळूज एमआयडीसी पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. चारही आरोपींना जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कॉलेज राजू गायकवाड (वय २१), सचिन हरिचंद जाधव (वय २२, दोघेही रा. कैकाडी मोहल्ला, जुना मोंडा), ओम मारुती पवार (वय १८, चमन चौक, माळीपुरा, जालना) आणि सुमित शैलेश घुरे (जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
Jalna News Today Marathi: चार दरोडेखोरांना वाळूज पोलिसांकडून अटक
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील कापड व्यापारी घनशाम अग्रवाल व त्याचा मित्र सर्फराज फिरोज खान हे २७ डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास जुना मोंढा शहर जालना शहरात स्कूटीवरून जात होते.
अग्रवाल यांच्याकडे १२ लाख ५० हजार रुपये असलेली बॅग होती. चौघा आरोपींनी स्कूटी थांबवून अग्रवाल व खान यांना जबर मारहाण केली. त्यानंतर बॅग हिसकावून ते पसार झाले. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालन्यातील बॅग चोरी (Jalna News Today Marathi) प्रकरणातील आरोपी रांजणगाव परिसरात लपून बसल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पीआय कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचून चारही आरोपींना अटक केली.
ही कारवाई सीपी प्रवीण पवार, डीसीपी नितीन बगाटे, एसीपी महेंद्र देशमुख, पीआय कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास विष्णव, बाबासाहेब काकडे, सुरेश भिसे, राजाभाऊ कोल्हे, नितीन इनाम, सुरेश कुचे, जालिंदर रांधे आदींनी केली.