Jalna News: जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी आणखी दोन सौर ऊर्जा प्रकल्प

Jalna News: कृषीप्रधान उपकेंद्रांच्या पाच किलोमीटर परिघात उभारण्यात आलेला हिवर्डी येथील सहा मेगावॅटक्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला असून ३० गावांना वीजपुरवठा होत असून त्याचा लाभ २ हजार ५७० कृषी जोडण्यांना झाला आहे.

Jalna News: कृषीप्रधान उपकेंद्रांच्या पाच किलोमीटर परिघात उभारण्यात आलेला हिवर्डी येथील सहा मेगावॅटक्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला असून ३० गावांना वीजपुरवठा होत असून त्याचा लाभ २ हजार ५७० कृषी जोडण्यांना झाला आहे.

जालना जिल्ह्यातील (Jalna News) शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत हिवर्डी व केळीगव्हाण या दोन सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे.

कृषीप्रधान उपकेंद्रांच्या पाच किलोमीटर परिघात उभारण्यात आलेला हिवर्डी येथील सहा मेगावॅटक्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला असून ३० गावांना वीजपुरवठा होत असून त्याचा लाभ २ हजार ५७० कृषी जोडण्यांना झाला आहे.

केळीगव्हाण गावातील पाच मेगावॅटक्षमतेचा हा प्रकल्प बुधवारपासून कार्यान्वित होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हे प्रकल्प सुरू करण्यात आले होते.

सध्या कृषी ग्राहकांना दिवसा व रात्री आवर्तन पद्धतीने वीज मिळते. गैरसोय कमी करण्यासाठी अखंडित दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. या सौर प्रकल्पांमुळे ही गरज भागणार आहे,’ अशी माहिती जालन्यातील महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी दिली.

जालना जिल्ह्यात (Jalna News) १२६ मेगावॅट क्षमतेचे २६ सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

This post is about Jalna News from Jalna district planning to set up two more solar energy projects specifically for the benefit of farmers.

Jalna News

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा