---Advertisement---
Jalna News

जालन्यात महाघोटाळा! ३ बँकांमध्ये ३८ कोटींची लूट; ‘फिर्यादी’ बँक मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार?

---Advertisement---
HIGHLIGHTS
  1. Quick summary of the latest Jalna News update.
  2. जालना: महाराष्ट्र राज्याचे उद्योग केंद्र म्हणून ओळखले जाणारे जालना शहर आता 'बँक घोटाळ्यांचे केंद्र' बनू लागले आहे. गेल्या काही...
  3. Local impact and reader takeaways are grouped for fast scanning.
  4. Follow Jalna News for verified updates as this story develops.

जालना: महाराष्ट्र राज्याचे उद्योग केंद्र म्हणून ओळखले जाणारे जालना शहर आता ‘बँक घोटाळ्यांचे केंद्र’ बनू लागले आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये तब्बल ३८ कोटी ७७ लाख रुपयांचे घोटाळे (Jalna bank scams) समोर आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सामान्य ठेवीदारांचे धाबे दणाणले असून जिल्ह्याचे संपूर्ण अर्थचक्र धोक्यात आले आहे.

Jalna bank scams: काय आहे नक्की प्रकरण?

जालना जिल्ह्यात बँकिंग क्षेत्राला हादरा देणाऱ्या तीन प्रमुख घटना एकापाठोपाठ एक समोर आल्या आहेत. यामध्ये ‘जालना मर्चंट बँक‘, ‘पूर्णवादी बँक‘ आणि ‘कॅनरा बँक‘ या तीन वित्तीय संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यांची व्याप्ती इतकी मोठी आहे की, आता राज्याची आर्थिक गुन्हे शाखा (EOW) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

१. जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक: २३.३३ कोटींचा मस्टर घोटाळा
सर्वात मोठा घोटाळा जालन्यातील ‘मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट सहकारी बँकेत’ उघड झाला आहे. येथे १७७ बनावट खातेदारांच्या नावावर तब्बल २३ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. गोदामात कोणताही शेतमाल नसताना बनावट ‘वेअर हाऊस’ पावत्या सादर करून बँकेला चुना लावण्यात आला.

Jalna Merchant Bank Scam EOW कडे तपास; ठेवीदारांची धाकधूक वाढली jalna Bank Scams

Jalna bank scams या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे, ज्या बँक महाव्यवस्थापकाने (GM) या घोटाळ्याची तक्रार पोलिसांत दिली होती, तो राजेंद्र टोकशा स्वतःच या कटात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आता खुद्द फिर्यादीलाच बेड्या ठोकल्या आहेत.

२. पूर्णवादी नागरिक सहकारी बँक: ८.१२ कोटींची फसवणूक
मर्चंट बँकेच्या घोटाळ्याचे धागेदोरे शोधताना ‘पूर्णवादी बँकेत’ देखील असाच प्रकार समोर आला. बनावट वेअर हाऊस पावतींच्या आधारे ३२ कर्ज खाती मंजूर करून बँकेची ८ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात देखील पंचमुखी वेअरहाऊसचा मालक रायचंद कुरंगळ याचे नाव समोर आले असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

Purnawadi Bank Scam जालन्यात मोठी खळबळ! पुर्णवादी बँकेत 8.12 कोटींचा महाघोटाळा Jalna Bank Scams

३. बदनापूर कॅनरा बँक: ७.३१ कोटींच्या सोन्याची अदलाबदल
जिल्ह्यातील बदनापूर येथील कॅनरा बँकेत तर त्याहूनही धक्कादायक प्रकार घडला. येथे ग्राहकांनी गहाण ठेवलेले अस्सल सोने लंपास करून त्या जागी बनावट सोने (नकली दागिने) ठेवण्यात आले. या ७ कोटी ३१ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात बँक अधिकारी आणि सोन्याची पारख करणाऱ्या सुवर्णकाराला अटक करण्यात आली आहे.

jalnanews.com jalna-merchant-bank-scam-3-arrested-eow-investigate jalna crime news today jalna bank scams
Also Read

Jalna bank scams: आर्थिक गुन्हे शाखेची (EOW) धडक कारवाई

जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आतापर्यंत या प्रकरणांत मुख्य सूत्रधार रायचंद कुरंगळ, राजेंद्र टोकशा आणि त्यांच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

घोटाळ्याचे मुख्य कारण काय?

  • बनावट कागदपत्रे: मयत व्यक्ती किंवा ज्यांनी कधी कर्ज मागितलेच नाही, अशा शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.
  • बँक अधिकाऱ्यांचे संगनमत: अंतर्गत ऑडिट किंवा तपासणी न होता कोट्यवधींचे कर्ज मंजूर होणे, हे बँक कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय अशक्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
  • मिरर इफेक्ट: एकाच वेअर हाऊस पावतीवर वेगवेगळ्या बँकांतून कर्ज उचलण्याचा प्रकार देखील समोर येत आहे.

Jalna crime news: ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Jalna bank scams या मोठ्या घोटाळ्यांमुळे जालन्यातील सामान्य नागरिक आणि विशेषतः अल्पबचत करणाऱ्या ठेवीदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. “आमचे कष्टाचे पैसे बँकांमध्ये सुरक्षित आहेत का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) देखील काही बँकांवर निर्बंध घातल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

Breaking News: आगामी काळात मोठी नावे समोर येण्याची शक्यता

आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात असे समोर आले आहे की, हा घोटाळा केवळ काही अधिकाऱ्यांपुरता मर्यादित नसून यात काही राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. EOW आता ‘मनी ट्रेल’चा (पैसा कोणाकडे गेला) तपास करत आहे, ज्यामध्ये अनेक बड्या धेंडांचे चेहरे समोर येऊ शकतात.

Read More from Jalna News

आजारी भाच्याला भेटायला गेला, ‘तो’ परतलाच नाही; नितीनसोबत भयंकर घडलं, ‘ते’ दृश्य पाहिलं अन् सगळेच हादरले!
जालन्यात मोठी खळबळ! पुर्णवादी बँकेत 8.12 कोटींचा महाघोटाळा
मंठा पोलिसांची मोठी कामगिरी: अवघ्या २४ तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस, आरोपी गजाआड

जालन्यातील (Jalna bank scams) हे बँक घोटाळे केवळ आर्थिक फसवणूक नसून सामान्य माणसाच्या विश्वासाचा खून आहे. जसा जसा तपास पुढे सरकत आहे, तसे नवनवीन खुलासे होत आहेत. आता लोकांचे लक्ष याकडे लागले आहे की, हे ३८ कोटी रुपये परत मिळतील का आणि या महाघोटाळ्याचा खरा ‘मास्टरमाइंड’ गजाआड होईल का?

Jalna bank scams FAQs

१. Jalna bank scams मध्ये एकूण किती रकमेचा घोटाळा झाला आहे?

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये एकूण ३८ कोटी ७७ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे.

२. जालन्यातील कोणत्या बँकांमध्ये हे घोटाळे झाले आहेत?

जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, पूर्णवादी नागरिक सहकारी बँक आणि बदनापूर येथील कॅनरा बँक या तीन बँकांमध्ये हे घोटाळे उघड झाले आहेत.

३. मर्चंट बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी कोण आहे?

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रायचंद कुरंगळ असून, बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

४. कॅनरा बँकेत नेमकं काय घडलं?

बदनापूर येथील कॅनरा बँकेत गहाण ठेवलेले ७.३१ कोटींचे अस्सल सोने चोरून त्या जागी बनावट दागिने ठेवण्यात आले होते.

५. या घोटाळ्यांचा तपास कोण करत आहे?

जालना पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences Wing – EOW) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

६. ACB Raid Jalna आणि या घोटाळ्याचा काही संबंध आहे का?

एसीबी (ACB) लाचखोरी प्रकरणांचा तपास करते, तर बँक घोटाळ्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करत आहे. मात्र, दोन्ही कारवाया भ्रष्टाचाराशी संबंधित आहेत.

Share this articleFacebookWhatsAppXTelegram
Jalna News Desk

Jalna News Desk

The Jalna News desk covers verified local updates, civic developments, public interest stories, and district-wide news for readers in Jalna and Marathwada.

Read More

Next story will load as you read
Loading next story...
Scroll to Top