अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना शासकीय मदतीची आस

कडाक्याची थंडी पडत असताना अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी (unseasonal rains) पाऊस झाला. यामुळे अंबड तालुक्यातील आवा शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष, पेरू, सीताफळ, मोसंबीच्या बागांचे देखील नुकसान झाले आहे.

Unseasonal Rains

पिकांचे प्रचंड प्रमाणात मठपिंपळगाव शिवारातील बागांमध्ये अशा प्रकारे पाणीसाठा झाला आहे. नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. यामुळे यंदा पिकातून चांगले उत्पन्न मिळेल. तसेच हातात दोन पैसेदेखील मिळतील या आशेने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरले गेले आहे. अवकाळी Unseasonal Rains पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सरकारने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी

यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यानंतर हिवाळा सुरु झाल्यापासून थंडीदेखील चांगली वाढली होती. यामुळे यंदा दोन हेक्टर द्राक्षांची बाग चांगली बहरत होती. त्यामुळे यावर्षी हमखास चांगले उत्पन्न मिळेल आणि दोन पैसे हाती येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अचानक पाऊस आला आणि संपूर्ण द्राक्षांच्या बागांचे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने द्राक्षबागांचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा आहे. – शेतकरी

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे

रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतले होते. ज्वारीचे पीक चांगले आले होते. मात्र, वातावरणात बदल होऊन पाऊस आणि वारा सुरु झाला. शेतातील ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. त्यामुळे ज्वारीला कणीस भरणार नाही. जनावरांना कडब (वैरण) म्हणूनच त्याचा उपयोग होईल. शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे. – शेतकरी

Sorce: lokmat.com

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा