Jalna: महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील साखर कारखान्यात टाकी फुटल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला तर एक जण जखमी झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, येथून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या परतूर (Partur) येथील बागेश्वरी साखर कारखान्यात (Bageshwari Sugar Factory accident) गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना टाकीत स्फोट झाला. सिंदखेडराजा येथील अशोक तेजराव देशमुख (५६) आणि परतूर (Partur) येथील आप्पासाहेब शंकर पारखे (४२) अशी मृतांची नावे आहेत. एका जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
परतूर (Partur) पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
