PM Kisan Nidhi Yojana: PM किसान सम्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जमा झाला नाही? मग येथे करा थेट तक्रार

PM Kisan Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही.

PM Kisan Nidhi Yojana beneficiary status

तुमची पीएम किसान सन्मान निधी योजना PM Kisan Nidhi Yojana beneficiary status तपासण्यासाठी येथे सोप्या पायऱ्या आहेत:

  • पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: pmkisan.gov.in
  • “शेतकरी कॉर्नर” विभागात जा
  • लाभार्थी स्थिती लिंक वर क्लिक करा.
  • आवश्यकतेनुसार तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा आणि सबमिट करा

मात्र या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी PM Kisan योजनेत ई-केवीआयसी करणे अनिवार्य होते. तसेच बँक खाते आधारसोबत लिंक असणे आवश्यक आहे.

परंतु काही चूक झाली असल्यास अथवा हप्ता जमा न झाल्यास शेतकरी थेट तक्रार करू शकतात. त्यासाठी शेतकरी 155261 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 1800115526 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात.

याशिवाय शेतकरी pmkisan-ict@gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवू शकतात.

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा