Skin care in winter: हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची अशी काळजी घ्या!!

Skin care in winter
Skin care in winter

Skin Care in Winter: हिवाळ्याच्या काळात, निरोगी त्वचा राखण्यासाठी शरीरांतर्गत आणि बाह्य अश्या दोन्ही गोष्टीची विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे.

Skin care in winter season

  1. हायड्रेशन ही मुख्य गोष्ट आहे : हिवाळ्याच्या महिन्यांत (Skin care in winter season) आपण चांगले हायड्रेटेड राहण्याची खात्री करा. तुमची त्वचा आतून मॉइश्चराइज ठेवण्यासाठी भरपूर पाणी, हर्बल टी आणि कोमट सूप प्या.
  2. मॉइश्चरायझिंग पदार्थांचा समावेश करा : बदाम, शेंगदाणे, फुटाणे, तीळ यासारख्या आवश्यक फॅटी ऍसिडने समृद्ध असलेले पदार्थ खा. हे त्वचेचे पोषण आणि नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
  3. व्हिटॅमिन सी-युक्त आहार : हिवाळी फळांचा समावेश अत्यावश्यक. संत्री, पेरू, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांत आणि ज्यात व्हिटॅमिन सी आहे अश्या भाज्या खाणे उत्तम. ह्यामुळे इम्युनिटी पण वाढायला मदत होते.
  4. कोमट पाणी, गरम नाही : आंघोळ करताना अति कढत गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावे. गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते, ज्यामुळे कोरडेपणा वाढत जातो.
  5. सौम्य साबण वापरा : सौम्य, हायड्रेटिंग साबण निवडा जे त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकत नाहीत. कठोर रसायने असलेले कठोर साबण आणि क्लीन्सर टाळा.
  6. नियमितपणे मॉइश्चरायझ करा : तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा.

संतुलित आणि पोषक आहारासोबत हिवाळ्यात (Skin Care in Winter) त्वचेला संपूर्ण मॉइश्चरायझ, निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत करू शकता.

Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *