Walmik Karad: वाल्मिक कराड संदर्भात महत्वाची बातमी समोर

वाल्मिक कराडवर मोक्का लागताच समर्थकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कालपासून परळी शहरात

Walmik Karad: बीडमधील अवादा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडवर केज न्यायालयाने मोक्का लावला आहे. त्यामुळे कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वाल्मिक कराडवर मोक्का लागताच समर्थकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कालपासून परळी शहरात बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र आजही परळीत तणावपूर्वक वातावरण दिसत आहे.

अशातच आज वाल्मिक कराडला (Walmik Karad) कोर्टात हजर करणार आहेत. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडचा सहभाग आहे की नाही? हे तपासण्यासाठी एसआयटीने कराडला ताब्यात घेतले आहे.

त्यामुळे आता खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीने केल्यानंतर एसआयटी कडून देशमुख हत्या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.

यादरम्यान एस आय टी कडून काही महत्त्वाची कागदपत्रे कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Walmik Karad

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा