Secure Online Transactions | ऑनलाईन व्यवहार करताना ‘या’ गोष्टी ठेवतील तुम्हाला हॅकर्स पासून सुरक्षित!

Secure online transactions: हॉटेल, खरेदी, किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी पेमेंट करताना आपण ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारतो. या मार्गातून अनेकदा हॅकर्स आपला डेटा सेव्ह करतात आणि त्यातून आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते.

जाणून घेऊयात यातून वाचण्याचे काही मार्ग: Secure Online Transactions

किराणा सामान मागवण्यापासून ते प्रवास बुक करण्यापर्यंत, आजकाल लोक केवळ काही क्लिकवर जलद आणि निर्विघ्न खरेदी करू शकतात. परंतु जसजसे व्यवहार फिजिकल कार्ड स्वाइपकडून डिजिटल मार्गाकडे वळत आहेत, तसतसे सुरक्षित पेमेंट (Secure Online Transactions) करणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊयात यातून वाचण्याचे काही मार्ग

व्हर्च्युअर किबोर्डचा वापर

आजकाल बँका ग्राहकांना व्हर्च्युअल की बोर्डची सुविधा देतात. बहुतेक ठिकाणी जिथे कीबोर्डचा वापर करावा लागतो तिथे हा व्हर्च्युअल कीबोर्ड असतो, जो स्क्रीनवर दिसतो. याचा फायदा म्हणजे ग्राहकांचा अत्यंत गोपनीय तपशील हॅकर्स पासून सुरक्षित (Secure online transactions) राहतो. जेव्हा प्रत्यक्ष लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर कीबोर्ड वापरला जातो त्यावेळी हॅकर्सना पासवर्ड क्रॅक करणं सोपं जातं.

एसएमएस किंवा इ-मेल अलर्ट

ह्यात व्यवहार होत असतानाच त्याबद्दलची माहिती एसएमएस किंवा इमेलद्वारे मिळते. आपण हा व्यवहार केला नसेल तर ताबडतोब बँकेला कळवता येतं. ह्याचं सेटिंग सेट करताना ते कमीत कमी रकमेचं ठेवावं. बँकेच्या सिक्युरिटी अलर्ट सिस्टीमपासून वाचण्यासाठी हॅकर्स व्यवहार करताना एकच मोठ्या रकमेचा व्यवहार करण्यापेक्षा कमी रकमेचे अनेक व्यवहार करतात, अशा वेळी लोएस्ट लेव्हल सेटिंगचा फायदा होतो.

सतत ओटीपीचा वापर

आजकाल बँका ऑनलाइन व्यवहारासाठी ग्राहकांना ओटीपीची सुविधा देतात. ज्यावेळी इंटरनेट कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणी व्यवहार केले जातात, अशावेळी ओटीपी हा सर्वात सुरक्षित (Secure online transactions) पर्याय मानला जातो. ज्यावेळी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन केले जाते तेव्हा हा ओटीपी रँडमली जनरेट होतो आणि एसएमएस किंवा इ-मेल वर ठरावीक कालावधीसाठी पाठवला जातो.

व्यवस्थित पिन सेट करणे

कार्ड चुकीच्या हाती लागलं तर तुमचा मोबाईल किंवा कॉम्प्युटर हॅक करून तुमच्या जोडलेल्या कागदपत्रातून जन्मतारीख सहजपणे मिळू शकते. तुमच्या मोबाईलच्या नोट्समध्ये, कॉम्प्युटरवर सेव्ह करून ठेवणंही धोकादायक ठरू शकतं.

जालना जिल्ह्यातील ब्रेकिंगसाठी सबस्क्राईब करा

तुमचा ई मेल आय डी भरा आणि जालना न्यूज ला सबस्क्राईब करा