Majhi Kanya Bhagyashree Yojana Form: राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार मुलींच्या जन्मानंतर 50,000 रुपये देत आहे. सरकारने मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. दोन मुली असलेल्या कुटुंबांला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana) संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे वयाची होईपर्यंत घेता येणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना चा लाभ कसा घ्याल? Majhi Kanya Bhagyashree Yojana
माझी कन्या भाग्यश्री योजना चा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मुलीच्या आणि आईच्या नावाने बँकेत जोईंट खाते उघडले जाते. यावर 1 लाख रु. चा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट फॅसीलीटी उपलब्ध आहे. Majhi Kanya Bhagyashree Yojana Form
याव्यतिरिक्त मुलीच्या जन्माच्या नंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना देखील 50 हजार रुपये मिळतात. मात्र माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana) अंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरता येतील.
आवश्यक कागदपत्रे : Majhi Kanya Bhagyashree Yojana Form
- आधार कार्ड
- आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर. पासपोर्ट फोटो
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
“माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना” योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मुलीच्या वतीने तिच्या पालकाांनी
करायचा अर्जाचा नमुना
Majhi Kanya Bhagyashree Yojana Form माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज
माझी कन्या भाग्यश्री योजना ची उद्दिष्टे
- लिंग निवडीस प्रतिबंध करणे
- बालिकेचा जन्मदर वाढविणे
- मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
- बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात समाजात कायमस्वरूपी सामुहिक चळवळ निर्माण करणे
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे
- सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या आणि त्या स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक महिला बचत गट, महिला मंडळे, व युवक मंडळ यांचाही सहभाग घेणे.
- तसेच जिल्हा, तालुका, आणि निम्नस्तरावर विविध संस्था व विविध सेवा देणारे यांचा समन्वय घडवून आणणे.
Majhi Kanya Bhagyashree Yojana Form
- 01 ऑगस्ट 2017 सालापासून महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासन विभागातर्फे सर्वप्रथम ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- Majhi Kanya Bhagyashree Yojana या योजने अंतर्गत, शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल
- या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- एक मुलगी: 18 वर्षे कालावधीसाठी रु. 50,000
- दोन मुली: प्रत्येक मुलीचे नावे 25 हजार रुपये
- 7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ
- दर सहा वर्षांनंतर कुटुंब जमा झालेले व्याज खात्यातून काढून घेऊ शकते.
- मुदत ठेवींच्या निर्मिती साठी रु. 20 कोटी (आर्थिक वर्ष 2017-18) आणि रु. 14 कोटी रुपये (वित्तीय वर्ष 2018-19) वितरित करण्यात आले आहेत