RTE प्रवेशाचा मोठा धमाका! 😱 जालन्यात एका जागेसाठी दोन दावेदार; पहा लॉटरी कधी निघणार?

Jalna RTE Admission 2026 साठी 5117 अर्ज दाखल Jalna RTE Admission 2026 साठी 5117 अर्ज दाखल

Jalna RTE Admission 2026: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या आरटीई (RTE) 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत जालना जिल्ह्यात एक मोठी घडामोड समोर आली आहे. शाळा आणि घराच्या अंतरातील नियमात शासनाने बदल केल्यामुळे अर्जांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, आता एका जागेसाठी दोन विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

अंतराचा नियम बदलला आणि अर्जांचा पाऊस पडला! Jalna RTE Admission 2026

यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला शाळा आणि घर यातील अंतराच्या नियमामुळे पालकांमध्ये संभ्रम होता. अनेकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, विविध संघटना आणि पालकांच्या मागणीनंतर शासनाने अंतराच्या नियमात बदल करून अर्जांसाठी मुदतवाढ दिली.

या निर्णयाचा परिणाम असा झाला की, जालना जिल्ह्यात ( Jalna RTE Admission 2026) अर्जांची संख्या थेट 5197 वर पोहोचली आहे. उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांचा हा आकडा दुप्पट आहे.

जालना जिल्ह्यातील आरटीईची आकडेवारी: Jalna RTE Admission 2026 Percetages

  • एकूण शाळा: 285
  • उपलब्ध जागा: 2602
  • प्राप्त अर्ज: 5197
  • तालुकानिहाय स्थिती: जालना तालुक्यात सर्वाधिक 87 शाळा आहेत, तर मंठा तालुक्यात सर्वात कमी 21शाळा या प्रक्रियेत सहभागी आहेत.

निवड प्रक्रिया: लॉटरी कधी निघणार?

सध्या दाखल झालेल्या अर्जांची छाननी शासन स्तरावर सुरू आहे. पालकांना आता वेध लागले आहेत ते ‘लॉटरी’ (Lottery Draw) चे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच लॉटरीची तारीख जाहीर केली जाईल. लॉटरीनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

“जालना जिल्ह्यातील 285 शाळांतील 2602 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. अर्जांची छाननी सुरू असून, लवकरच लॉटरी पद्धतीने निवड होईल. निवड झालेल्या पालकांना वेळेत कळवले जाईल.”
— संगीता भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक विभाग)

Read More from Jalna News

Jalna Police Bharti: उमेदवारांची तात्पुरती गुणांची यादी जाहीर!

JEE Main 2026: एप्रिल परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 5 एप्रिलचा पेपर ‘रिसेड्युल’ – पाहा नवीन Dates

MHT CET 2026: इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेशासाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सर्व अपडेट्स

गेल्या वर्षीच्या रिक्त जागांचा धडा

गतवर्षी आरटीई अंतर्गत काही जागा रिक्त राहिल्या होत्या. पालकांनी आपल्या पसंतीची शाळा न मिळाल्याने प्रवेश नाकारले होते. मात्र, यावर्षी नियमातील शिथिलतेमुळे आणि वाढत्या अर्जांमुळे सर्व जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीनंतर जागा शिल्लक राहिल्यास पुढील टप्प्यात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल.

पालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स:

  1. अर्जाची स्थिती तपासा: आरटीईच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली का ते तपासा.
  2. कागदपत्रे तयार ठेवा: लॉटरीत नाव आल्यास प्रवेशासाठी लागणारी सर्व मूळ कागदपत्रे (उदा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला) तयार ठेवा.
  3. लॉटरीची प्रतीक्षा: निवड यादी जाहीर झाल्यावर संबंधित शाळेत जाऊन दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करा.

RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (Jalna RTE Admission 2026 Documents Checklist):

१. रहिवासी पुरावा (खालीलपैकी कोणतेही एक):

  • रेशन कार्ड (Ration Card)
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • मतदान ओळखपत्र (Voter ID)
  • वीज बिल / टेलिफोन बिल
  • जर भाड्याच्या घरात राहत असाल, तर नोंदणीकृत भाडेकरार (Registered Rent Agreement) – जो अर्ज करण्यापूर्वीचा असावा.

२. जन्माचा दाखला (Birth Certificate):

  • ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका यांचा अधिकृत दाखला.

३. उत्पन्नाचा दाखला (Income Certificate):

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असल्याचा तहसीलदारांचा दाखला.
  • (टीप: जर तुम्ही SC/ST प्रवर्गातून अर्ज करत असाल, तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसते, मात्र जातीचा दाखला आवश्यक असतो.)

४. जातीचा दाखला (Caste Certificate):

  • आरक्षित प्रवर्गातून (SC, ST, VJNT, OBC, SBC) अर्ज करत असल्यास वडिलांचा किंवा विद्यार्थ्याचा जातीचा दाखला.

५. विद्यार्थ्याचे आधार कार्ड:

  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार नसेल तर नोंदणी पावती (Enrollment Slip) चालेल, पण प्रवेशावेळी आधार कार्ड सादर करावे लागेल.

६. अपंगत्व प्रमाणपत्र (Disability Certificate):

  • जर विद्यार्थी दिव्यांग असेल, तर जिल्हा शल्यचिकित्सकांचे (Civil Surgeon) ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र.

७. छायाचित्र (Photographs):

  • विद्यार्थ्याचे अलीकडचे २-३ पासपोर्ट साईज फोटो.

पालकांसाठी महत्त्वाची सूचना: Jalna RTE Admission 2026

  • सर्व कागदपत्रे मूळ प्रत (Original) आणि त्यांच्या किमान 2-3 साक्षांकित छायांकित प्रती (Attested Xerox) सोबत ठेवा.
  • कागदपत्रांवरील नावामध्ये आणि अर्जातील नावामध्ये तफावत नसावी (उदा. स्पेलिंग मिस्टेक).
  • तुमचा मोबाईल नंबर चालू ठेवा, कारण लॉटरी लागल्याचा मेसेज त्याच नंबरवर येतो.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मिळणाऱ्या या मोफत प्रवेशासाठी जालन्यात मोठी स्पर्धा आहे. अंतराच्या नियमातील बदलाने सामान्य कुटुंबातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडे अधिक रुंद झाली आहेत.

अशाच ताज्या शैक्षणिक अपडेट्स आणि बातम्यांसाठी आमच्या पेजला भेट द्या. Jalna News

3 comments

Comments are closed.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use