---Advertisement---
Jalna News

एप्रिलमध्ये येणार डबल डेकर (Double Decker) राज्याची पर्यटन राजधानी नव्याने पाहण्याची संधी

---Advertisement---
HIGHLIGHTS
  1. Quick summary of the latest Jalna News update.
  2. Double Decker: छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन स्थळ पाहता यावेत, यादृष्टीने महापालिकेने दोन डबल डेकर बस...
  3. Local impact and reader takeaways are grouped for fast scanning.
  4. Follow Jalna News for verified updates as this story develops.

Double Decker: छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन स्थळ पाहता यावेत, यादृष्टीने महापालिकेने दोन डबल डेकर बस घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला. एप्रिलमध्ये या बस शहरात दाखल होणार आहेत. त्यासाठी मंगळवारी महापालिकेत विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली.

डबल डेकर (Double Decker) बस एप्रिलमध्ये येणार

शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांना पाहिजे तशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे महापालिकेने डबल डेकर (Double Decker) बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. बस बांधणीचे काम सोलापूर येथील चव्हाण ऑटो व्हील कंपनीला दिले आहे. कंपनीने बसचे चेसिस, डिझाइन रेडी केले असून, बांधणीसाठी कर्नाटकमधील बॉडीबिल्डरला कामही दिले.

बसच्या फिटनेस सर्टिफिकेटबाबतही आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. दोन्ही बस शहरातील कोणत्या मार्गाने धावतील यादृष्टीने आज एमटीडीसी, आयटीडीसी, गाइड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या. बसमध्ये स्थानिक कलावंतांचे सादरीकरण, बसमधील पर्यटकांना नाश्ता, जेवण देण्यासंदर्भातही सूचना करण्यात आल्या.

ई-डबल डेकर (Double Decker) बस १७ फूट उंच राहणार आहे. त्यामुळे मार्ग ठरविताना या बाबीचा विचार करावा लागणार आहे, मार्ग ठरल्यानंतर महावितरणला कळवून, रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या विजेच्या तारा हटविण्यात येतील. बसमध्ये ऑडिओ गाइडची सुविधा असून, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, जॅपनीज अशा ६ विदेशी भाषांमध्ये संबंधित पर्यटनस्थळांबाबत माहिती पर्यटकांना ऐकता येईल.

बैठकीत आढावा मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता ए. बी. देशमुख, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, विद्युत विभागाच्या मोहिनी गायकवाड, एमटीडीसीचे विजय जाधव, आयटीडीसीच्या स्नेहल पाटील, टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जयवंतसिंग, एमएसईबीचे अधीक्षक अभियंता एम. बी. ठाकरे, चव्हाण ऑटो व्हील कंपनीचे शकील अहेमद आदींची उपस्थिती होती.

Share this articleFacebookWhatsAppXTelegram
Jalna News Desk

Jalna News Desk

The Jalna News desk covers verified local updates, civic developments, public interest stories, and district-wide news for readers in Jalna and Marathwada.

Read More

Next story will load as you read
Loading next story...
Scroll to Top