Jalna: जालना एमआयडीसी परिसरातील स्टील कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन 22 कामगार जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Boiler Explosion At Steel Factory in Jalna MIDC
जालना एमआयडीसी परिसरातील स्टील कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन 22 कामगार जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.
गज केसरी स्टील मिलमध्ये दुपारच्या सुमारास झालेल्या स्फोटात वितळलेले लोखंड कामगारांवर पडले, असे ते म्हणाले.
तीन कामगारांना गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, कारखाना भंगारातून स्टील बार तयार करतो, पोलिस जखमी कामगारांचे जबाब नोंदवत आहेत. कंपनी मालकावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.